मान्सूनचा परतीचा पाऊस सातारा जिल्ह्यातील विविध भागासह फलटण तालुक्यात झाल्याने नदी ओढे तलाव बंधारे भरले

आदर्की बुद्रुक दि. ३० : यावर्षी मान्सूनचा परतीचा पाऊस सातारा जिल्ह्यातील विविध भागासह फलटण तालुक्यात झाल्याने नदी ओढे तलाव बंधारे भरले आहेत तथापी हिंगणगांव ता.फलटण  येथील तलाव कोरडा असल्याने शेतकऱ्यांची पिक धोक्यात आली आहेत. धोम -बलकवडी कनालला पाणी सोडले असतानाही तलाव गावाला पाणी सोडले नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून आगामी फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थ यांनी घेतला आहे .
 धरण क्षेत्रात पाऊस होवून धरणे भरली असल्याने धोम-बलकवडी कनालला पाणी सोडण्यात आले आहे. फलटण -खंडाळा  तालुक्यातील कनालला पाणी सुटल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे तथापी फलटण तालुक्यातील हिंगणगाव व आरडगाव या गावांना पाणी सोडण्यात आले नसल्याने दोन गावे ऐन पावसाळ्यात पाण्यापासून वंचित राहिली आहेत. 
धोम -बलकवडी कनाल पोटपाटाद्वारे या दोन्ही गावांना पाणी देण्यात आले असते मात्र गेल्या तीन वर्ष कॅनॉलचे पाणी या गावांना मिळाले नाही. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी पाणी मिळण्याच्या आशेने स्वखर्चाने पोट पाटाची अनेकवेळा दुरुस्ती केली मात्र दरवर्षी  शेतकरी व ग्रामस्थ यांच्या पदरी निराशा येत आहे .
गावच्या पश्चिमेस  असणाऱ्या नळाचा ओढ्यावर दोन तलाव , चार नालाबांध असुन खंडोबा तलाव  पाण्याने पूर्ण भरला आहे. या तलावातील पाण्याचा परिसरातील ४०० हेकटर शेतीला फायदा होत आहे. तीन वर्ष झाले या तलावात पाणी सोडण्यात आले नाही. यावर्षी पावसाने पाठ फिरवली असली तरी धोम -बलकवडी कनालचे पाणी मिळेल या आशेवर  ग्रामस्थ होते मात्र सुटलेल्या पाण्याची पाळी संपत आली तरीही पाणी सोडले नाही. पाणी सोडण्याची मागणी केली असतानाही या दोन्ही गावांना ऐन पावसाळ्यात पाऊस नसताना पाणी सोडले गेले नाही. 
 हिंगणगांव येथील तलावात पाणी न सोडल्यास  आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे माजी सरपंच बाळासो अहिरेकर, विजय किसन भोईटे , विलास भोईटे , सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव ढमाळ , संदिप ढमाळ ,ज्ञानदेव भोईटे, अनिल भोईटे , सुरेश भोईटे , संजय भोईटे , किशोर भोईटे , सुरज  भोईटे यांच्यासह ग्रामस्थांनी सांगीतले .
शेजारी असलेल्या शेरेचीवाडी ता. फलटण या गावासाठी पाणी सोडले जाते तेथून पुढे पाणी सोडण्यास अधिकारी नकार देवून पाणी बंद करीत असल्याचे ग्रामस्थ यांनी सांगितले. सालपे ता. फलटण येथून जाणाऱ्या पोटपाटामध्ये झाडे झुडपे वाढली असल्याने पोटपाटात पाणी बसत नाही. याबाबत संबंधित खात्याला सुचना  दिली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!