फलटण, दि. 28 : कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य कार्यालय मार्केट यार्ड फलटण येथे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर याच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात येत असून सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घ्यावा असे आवाहन सचिव शंकर सोनवलकर यांनी केली आहे.
कषी उत्पन्न बाजार समितीच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे कामकाज वृत्तांत वाचुन कायम करणे, सन 2018-19 या वाार्षिक अहवाल माहिती घेणे, सन 2018-2019 आर्थिक
पत्रकाची माहिती घेणे. सन 2019 – 2020 चे वार्षिक अंदाजपत्रकाचा माहिती घेणे, सन 2017-2018 चे शासकीय वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेणे, मा. अध्यक्ष यांचे पुव परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे यासह 6 विषय या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभेस शेतकरी सभासद यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.