फलटण, दि. 27 : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 रोजी दुपारी 1.00 वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात येत असून सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घ्यावा अशी विनंती कारखान्याचे कार्यकारी संचालक सी.डी. तळेकर यांनी केली आहे.
कारखान्याच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे कामकाज वृत्तांत वाचुन कायम करणे, सन 2018-19 या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्विकारणे, कारखान्याचे अर्कशाळा विभागासह सन 2018-19 या आर्थिक वर्षातील हिशेबाचे ताळेबंद व नफातोटा पत्रके दाखल करुन घेणे, वैधानिक लेखा परिक्षण अहवालाची नोंद घेणे, संचालक मंडळाने सादर केलेले अंदाजपत्रक आणि निधी उभारणीसाठी सुचविलेल्या उपाय योजनांची नोंद घेणे यासह 8 विषय या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले आहेत.