फलटण, दि. 27 : फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि., फलटण या संस्थेची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात, तांबमाळ फलटण येथे रविवार दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संघाचे चेअरमन धनंजय पवार यांनी दिली आहे.
फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि., फलटण या संस्थेची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात, तांबमाळ फलटण येथे होणार
या सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत कायम करणे, सन 2018-19 सालातील संस्थेचे ताळेबंद, नफा तोटा व व्यापारी पत्रके, सन 2019-20 चे अंदाजपत्रक मंजूर करणे, खेळते भांडवलासाठी रक्कम उभारणी करण्याबाबत आणि बाहेरील कर्जाची मर्यादा ठरविण्याचे अधिकार संचालक मंडळाला देणे वगैरे 10 विषय या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर आहेत.
सर्व दूध उत्पादक सभासद, सलग्न सहकारी संस्था यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापक टी.आर. नलवडे यांनी केले आहे.