माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्टचेवतीने माळजाई मंदिर परिसर स्वच्छता अभियान मोहिम संपन्न

फलटण दि. 26 : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्टचे चेअरमन प्रतापसिंह निंबाळकर हे गेल्या अनेक वर्षापासून फलटण शहर व परिसरात सामाजिक उपक्रमाद्वारे काम करीत असून माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्टचेवतीने माळजाई मंदिर परिसर स्वच्छता अभियान मोहिम राबविणेचा निर्णय निंबाळकर व त्यांचे सहकारी यांनी घेतला त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी केले. 
येथील लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट, फलटण 
यांच्यावतीने नवरात्री उत्सवापुवी माळजाई मंदिर परिसर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ लायन्स क्लब अध्यक्ष अर्जुन घाडगे यांचेसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव लायन्स क्लब अध्यक्ष अर्जुन घाडगे, लायनेस अध्यक्षा सौ. कदम ला. मंगेश दोशी, ला. निकम ला. कदम लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.
फलटण शहरातील पुरातन मंदिर म्हणून माळजाई मंदिरची ओळख असून लायन्स क्लबचे माध्यमातून अनेकांनी मंदिर परिसरात विविध धार्मिक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. कै. कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांनी माळजाई मंदिर समितीची धुरा सांभाळली असल्याची आठवण मेहता यांनी यावेळी करून दिली.
यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष अर्जुन घाडगे व प्रा. रमेश आढाव यांनी मार्गदर्शन केले.
फलटण येथील माळजाई मंदिरामध्ये देवीची मूर्ती असून मंदिराच्या परिसरात उद्यान आहे. नवरात्रीपूवी येथील परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय समितीने घेतला असून या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. काशीदवाडी व निंभोरे परिसरातील माता भगिनींनी  यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. लवकरच परिसरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट चेअरमन प्रतापसिंह निंबाळकर यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले. 
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माळजाई मंदिर परिसर स्वच्छता अभियान मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 
कार्यक्रमास माळजाई मंदिर उद्यान कमिटी व्हाईस चेअरमन रतनसीभाई पटेल, संचालक बाळासाहेब यादव, प्रकाशराव मोरे, ला. महेश साळुंखे, लायनेस सेक्रेटरी नीलम लोंढे पाटील, खजिनदार अर्चना बर्गे,  ला. रविकांत इंगवले,  आकाश कदम व्यवस्थापक राजाभाऊ शिरतोडे यांच्यासह लायन्स व लायनेस क्लब सदस्य  व नागरिक महिला उपस्थित होत्या.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!