कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपविभागीयस्तरीय कार्यशाळा संपन्न

फलटण दि. २३ : कृषि विभागतील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सोप्या भाषेत समजेल अशी नवीन संकल्पना वापरून तयार केलेल्या प्रचार आणि प्रसिद्धी साहित्यामधील  कृषि संदेश पुस्तक, हॅन्डव्हील ,व्हिजिटिंग कार्ड व पोस्टरस इत्यादी उपयोगी पडून याद्वारे ते शेतकरी यांना फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा फलटण उपविभागीय कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. 
विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर दशरथ तांबाळे, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा विजयकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय कृषि अधिकारी फलटण प्रकाश सुर्यवंशी,  तालुका कृषि अधिकारी फलटण गोरखनाथ डोईफोडे यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक भवन फलटण येथे पिकावरील किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्राँपसँप) सन २०१९-२० अंतर्गत उपविभागातील सर्व  अधिकारी व कर्मचारी यांची  उपविभागीयस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी ऊस विशेषयज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद पाडेगाव डॉ. भारत रासकर, डॉ आणासाहेब तांबे किटकशस्त्राज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव डॉ. आण्णासाहेब तांबे, कृषि सेवा केंद्र फलटण तालुका अध्यक्ष रणजित निंबाळकर , विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र बोरगाव डॉ. स्वाती गुरवे, विभागीय सॉफ्टवेअर सपोर्टर कोल्हापूर मारुती बगे यांंची उपस्थिती होती. 
मका व हरभरा पिकावरील किडीचे नियंत्रण होऊन पिकाचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे  सांगून प्रचार व प्रसिद्धी साहित्य कृषि सेवा केंद्र मालकांनी आपल्या दुकानात दर्शनी भागात लावून ते शेतकऱ्यांपर्यन्त पोचवण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी सुर्यवंशी यांनी यावेळी केले. 
 पिकांवरील कीड व  रोग नियंत्रण माहिती पत्रके कोणत्या ठिकाणी लावण्यात यावी याबाबत  सविस्तर  मार्गदर्शन तालुका कृषि अधिकारी फलटण गोरखनाथ डोईफोडे यांनी केले. 
मका पिकांवरील लष्करी अळी नियंत्रण रासायनिक व जैविक नियंत्रणबाबत सविस्तर मार्गदर्शन किटक शस्त्राज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे डॉ आणासाहेब तांबे यांनी केले. 
 मका पिका विषयी व ऊस पिकावर सविस्तर मार्गदर्शन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद पाडेगावचे ऊस विशेषज्ञ डॉ भारत रासकर यांनी केले. 
पिकावरील किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्राँपसँप) मोबाईल अँप सविस्तरपणे माहीती विभागीय सॉफ्टवेअर सपोर्टर कोल्हापूर 
मारुती बर्गे यांनी दिली. 
 विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र बोरगाव डॉ स्वाती गुरवे यांनी पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण कार्यपद्धती बाबत महिती दिली. 
फलटण व माण तालुक्यातील सर्व कृषि सेवा केंद्र मालक नेहमी कृषि विभागाच्या बरोबरीने काम करीत असतात यावेळी सुध्दा हे प्रचार प्रसिध्दी साहित्य निश्चित शेतकऱ्यांपर्यन्त पोचविण्याचे काम करण्यात येईल असे कृषि सेवा केंद्र फलटण तालुका अध्यक्ष रणजित निंबाळकर यांनी सांगितले. 
फलटण तालुक्यातील हुमणी नियंत्रणमध्ये राजाळे गावातील सचिन जाधव  कृषि सहायक यांनी आदर्श असे कार्यक्रम राबविल्याचे व रात्री ११ वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यन्त उपविभागीय  कृषि अधिकारी  व तालुका कृषि अधिकारी हे काम करत असल्याचे यावेळी सांगितले. 
फलटणमध्ये  अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणबाबत काम चांगले झाले असल्याचे व या कार्यशाळेमध्ये देण्यात आलेले शेतकऱ्यांसाठी मका व हरभरा कीड नियंत्रण माहीती पत्रक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर  असल्याचे यावेळी सांगितले.
प्रशिक्षण साहित्याचे प्रकाशन श्रीमती नरळे कृषिसहायक , श्रीमती तृप्ती शिंदे कृषिसहायक फलटण लक्ष्मण राऊत कृषि सहायक माण तानाजी कुंभार फलटण यांच्या हस्ते करण्यात आले.  
अमेरिकन लष्करी अळी व हरभरा पिकावरील घाटे अळी नियंत्रण माहीती पत्रक तयार करण्यासाठी विशेष योगदान दिलेबद्दल अमोल सपकाळ मंडळ कृषि अधिकारी विडणी यांचा डॉ भारत रासकर ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद पाडेगाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप नेवसे यांनी केले. शेख यांनी शेवटी आभार मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!