फलटण दि. २३ : भारत निवडणुक आयोग यांच्या आदेशानुसार मतदार जनजागृती (स्वीप) मोहिम कार्यक्रम फलटण तालुक्यात सुरू करण्यात आला असून २५५ फलटण कोरेगाव (अ. जा. ) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करणेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (sveep ) या कार्यक्रमाअंतर्गत मुखाध्यापकांची कार्यशाळा सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी पंचायत समिती फलटण येथे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका यांचे मतदारांनमध्ये जनजागृती करणेबाबत कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी अमिता पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मतदारांमध्ये जनजागृती (स्वीप) मोहिम कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा, रॅली, पथनाट्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे व मतदानाची टक्केवारी वाढविणे व कमी मतदान झालेली केंद्रावरील मतदान वाढविणे याबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सांगितले.
मतदार जनजागृती (स्वीप) कार्यक्रम राबविताना मतदारांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून १०० % टक्के मतदान होण्याबाबत प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे व मतदारांमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी याबाबत आयोजन केल्याचे गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी सांगितले.
यावेळी स्वीप नोडल ऑफिसर किरण उदमले यांनी मतदार जनजागृती (स्वीप) कार्यक्रम कार्यपद्धतीबाबत सविस्तरपणे माहीती दिली.
कार्यक्रमास स्वीप सहायक नोडल ऑफिसर सचिन जाधव व फलटण तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुखाध्यापक, मुख्याध्यापिका
उपस्थिती होत्या.