फलटण दि. २३ : लोहार समाज सातारा जिल्हा संघटनेच्यावतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोहार समाजातील पूरग्रस्त कुटुंबांना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पंचवीस ते तीस हजार रुपयांची रोख रक्कम देऊन त्यांच्यावरील संकटप्रसंगी संघटनेने आर्थिक मदत केली असल्याचे जिल्हाध्यक्ष एच.आर. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा लोहार समाज संघटनेच्यावतीने रोख रक्कम पुरग्रस्त यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यांचे बँक अकौंट नंबर घेण्यात आले असून दौऱ्यात अखिल महाराष्ट्र गाडी लोहार विकास महासंघाचे अध्यक्ष सदाशिवराव पोफळकर, उपाध्यक्ष नामदेव चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष व लोहसंस्कार साप्ताहिकाचे संपादक हनुमंतराव चव्हाण उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिन चव्हाण, लक्ष्मण जगताप, अशोकराव माने, मारुती पवार, जगदीश माने, फलटण तालुकाध्यक्ष बाळासाहेब वसव महादेव वसव (आण्णा) यानी निधी संकलन व वितरण कामात संघटनेला मदत व सहकार्य केले आहे.
इचलकरंजी येथील पूरग्रस्त महिला श्रीमती हौसाबाई लोहार, श्रीमती मालुबाई लोहार, श्रीमती गौराबाई लोहार, यांच्या पडलेल्या घरांची पाहणी करुन त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन संघटनेचे वतीने देण्यात आले.
सांगलवाडी येथील पूरग्रस्त महिला श्रीमती वैशाली नितीन वसव, भिलवडी येथील पूरग्रस्त नामदेव सावळा लोहार यांचे लोहार कामाचे संपूर्ण दुकान व हत्यारे औजारे वाहुन गेल्याने कुटुंबाचे उदर निर्वाहाचे साधनच गेल्याने त्यांच्यावर मोठा आघात झाला त्यांना रोख रक्कम देण्यात आली. कोल्हापूर येथील भगवान देसाई व आकाश देसाई यांनाही रोख रक्कम देण्यात आली.
लोहार समाजातील नेतृत्वाने पूरग्रस्त व त्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून लोहार समाज संघटनेच्या फलटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभल्याचे चव्हाण सर यांनी आवर्जून सांगितले.