फलटण दि. 22 : श्री साई सेवा मंडळ जाधववाडी ता. फलटण येथील श्री साईबाबा मंदिर येथे साईबाबा यांच्या 101 वी पुण्यतिथी व विजया दशमी उत्सवानिमित्त रविवार दि. 29 सप्टेंबर ते मंगळवार दि. 8 आॅक्टोंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
श्री साई सेवा मंडळाचेवतीने मंदिर येथे गेली अनेक वर्ष दर गुरुवारी मोफत अन्नदान केले जाते. दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी श्री साई सतचरित्र ग्रंथाचे पूजन व पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे..
विजयादशमी उत्सव सोहळ्यामध्ये रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात मलठण यैथील शिवदत्त भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात द. रा. चरेगावकर यांचे गायन होणार आहे.
सोमवार दि. 30 रोजी सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात फलटण येथील दुर्गा भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात डॉ अवधूत जोशी यांचे गायन होणार आहे.
मंगळवार दि. 1 रोजी आॅक्टोंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात फलटण येथील गीता भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात अनंत नेरकर यांचे गायन होणार आहे.
बुधवार दि. 2 रोजी आॅक्टोंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात फलटण येथील लिलावती भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात श्रीनंद हळबे यांचे गायन होणार आहे.
गुरुवार दि. 3 रोजी आॅक्टोंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात फलटण येथील श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामसाधना आरती मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात सौ. सुभद्रा आळंदे यांचे गायन होणार आहे.
शुक्रवार दि. 4 रोजी आॅक्टोंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात फलटण येथील श्री सद्गुरू दादा महाराज भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात श्रीमती सुधाताई पटवर्धन यांचे गीतरामायण होणार आहे.
शनिवार दि. 5 रोजी आॅक्टोंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात फलटण येथील श्री वीरशैव भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात श्रीमती गिरीजाताई बडोदेकर यांचे गायन होणार आहे.
रविवार दि. 6 रोजी आॅक्टोंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात फलटण येथील शारदा भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 4 ते 6 या वेळात ह. भ. प. सौ. पुष्पाताई कदम यांचे प्रवचन होणार आहे.
सोमवार दि. 7 आॅक्टोंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात जाधववाडी ता. फलटण येथील वरदविनायक भजनी मंडळ यांचे भजन होणार असुन दुपारी 5 ते 6 या वेळात माऊली भजनी मंडळ निरगुडी यांचे भजन होणार आहे.
मंगळवार दि. 8 रोजी आॅक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजता काकडा आरती मंगलस्नान साई महिमा पठण, सकाळी 8.30 वाजता ह. भ. प.बी. एन. कुंभार यांचे प्रवचन, दुपारी 12 वाजता मध्यान आरती व प्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता सांज आरती व रात्री 10 वाजता शेजारती होणार आहे.
जाधववाडी ता. फलटण येथील व परिसरातील नागरिक महिला यांनी श्री साईबाबा मंदिर येथे साईबाबा यांच्या 101 वी पुण्यतिथी व विजया दशमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष एम. पी. कुंभार उपाध्यक्ष एस. एस. जोशी खजिनदार बी. बी. तावरे सचिव एस. आर. लोहार व पदाधिकारी यांनी केले आहे.