आपल्या कार्यकर्तृत्वाचा आगळा वेगळा ठसा निर्माण करुन समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कै. सर्जेराव बाबुराव पोळ यांचा गुरुवार दि. 19 सप्टेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन

फलटण दि. 18 : आदर्की बुद्रुक ता फलटण गावचे विविध क्षेत्रात गेल्या 4 दशकाहून अधिक काळ सामाजिक राजकीय शैक्षणिक कषी क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा आगळा वेगळा ठसा निर्माण करुन समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या कै. सर्जेराव बाबुराव पोळ यांचा गुरुवार दि. 19 सप्टेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. 
सर्जेराव बाबुराव पोळ यांचा जन्म आदर्की बुद्रुक ता फलटण येथील शेतकरी कुटुंबात दि. 1 जून 1946 साली झाला. शालेय शिक्षण फक्त 8 वी पर्यंत झाले आहे मात्र सामाजिक व राजकीय क्षेत्र त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब धुमाळ यांच्या बरोबरीने त्यांनी गावात काम करण्यास प्रारंभ केला.
आदर्की बुद्रुक ता फलटण गावचे 5  वर्षे उपसरपंच म्हणून काम पाहिले. समाजहिताचे काम करणाऱ्या सामाजिक धार्मिक क्षेत्रात वेगवेगळे काम त्यांनी आपले सहकारी यांच्या माध्यमातून उभे केले. बाळासाहेब मोहोळकर यांच्या बरोबरीने त्यांनी गावचे विकासासाठी प्रयत्न केले. श्री भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक म्हणून त्यांनी कामकाज केले. श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑप ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक संचालक म्हणून कार्यरत होते.
सर्जेराव पोळ यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याबरोबरच आपल्या पारंपरिक शेती व्यवसाय याकडे कटाक्षाने लक्ष देवून शेतात विविध प्रयोग यशस्वीरित्या राबविले आणि दुष्काळातही आपला शेती व्यवसाय नेटका व उत्कृष्टरीत्या सांभाळून यश संपादन करण्यात ते यशस्वी झाले. 
कै. सर्जेराव पोळ यांच्या पश्चात प्रेरणा घेवून त्यांचे दोन सुपुत्र संजय व सचिन पोळ कुटुंबातील व इतर जबाबदारी पेलत आहेत. त्यांच्या दोन मुलीही यशस्वीरित्या आपल्या सासरी कुटुंबीय यांच्या साथीने प्रयत्नशील आहेत. 
कै. सर्जेराव पोळ यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आदर्की बुद्रुक ता फलटण येथे ह. भ. प. जगताप महाराज याचे कितनाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील ग्रामस्थ मित्र मंडळी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!