होळ ता. फलटण येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणूकबाबत EVM व VVPAT जनजागृती मोहीम

फलटण दि. 15 : भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चे निमित्ताने मतदानासाठी EVM व VVPAT ह्या मशिनबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणेसाठी मोहीम राबविण्याचे आयोजन शहर व तालुक्यात करण्यात आले असून होळ ता. फलटण येथे नुकताच त्याचा शुभारंभ करण्यात आला. 
255 (अ. जा.) फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील एकूण १५३ गावांमध्ये २२१ ठिकाणी जागरुकता मोहीम राबविण्याबाबत आदेश देण्यात आले असून कर्मचाऱ्यांच्या दोन स्वतंत्र टीम तयार करून EVM व VVPT जनजागृती कार्यक्रम गावोगावी राबविणेत येत असल्याचे सांगण्यात आले. 
 होळ ता. फलटण येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी EVM व VVPAT बाबत मतदारांमध्ये जनजागृती मोहीमबाबत सहायक sveep नोडल ऑफिसर सचिन जाधव  यांनी सविस्तर माहिती मतदार यांना दिली. 
 मतदार यांनी EVM मशीनमध्ये आपले मत नोंदवून त्यानीं VVPAT मध्ये आपले मत दिले त्यांनाच मिळाले आहे का याची खात्री करुन प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. यावेळी उपस्थित  मतदार यांनी आपले मत नोंदणी करून खात्री करून घेतली. EVM मशीनमध्ये एकूण नोंदविली गेलेली व पडलेली मते उपस्थित मतदार यांना दाखवण्यात आली. 
फलटण येथील प्रांताधिकारी शिवाजी जगताप  तहसीलदार हनुमंत पाटील नायब तहसीलदार अनंत गवारे, sveep नोडल ऑफिसर के. पी. माने  यांच्या मार्गदर्शनाखाली मतदाराची EVM व VVPAT ह्या मशिनबाबत जागरूकता निर्माण करणेसाठी मोहीम 
सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
यावेळी  वैभव जाधव  EVM व VVPAT पथक कर्मचारी, विमल शिवाजी पुरी blo भाग क्रमांक १० होळ , पुष्पा वसंत जगताप blo भाग क्रमांक ०९ होळ यांच्यासह होळ गावातील मतदार ग्रामस्थ उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!