फलटण दि. 13 : आदर्की बुद्रुक ता फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून आर्थिक मदत जमा करुन शाळेत नुकताच डिजीटल क्लासरुम सुरु केला असून त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळेच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आदर्की बुद्रुक ता फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ६७ वर्षं पूर्ण होत आहेत १९५२ साली गावातील सहकाऱ्यांनी आदर्की बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शासनाच्या माध्यमातून सुरु केली. आज आदर्की बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १०२ विद्यार्थी असून ४ शिक्षक आहेत.
आदर्की बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी डिजिटल क्लासरुम करण्यासाठी संगणक, प्रिंटर, 2 स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर व स्क्रीनला लागणारे स्टॅण्ड ही मदत शाळेला उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शाळेतील आफीस खोलीचे सेफ्टी डोअर व खिडकी यांना संपूर्ण संरक्षण करुन देण्यात आले आहे. गावातील 148 ग्रामस्थ व शाळेचे माजी विद्यार्थी व अन्य यांनी मदत रोख स्वरूपात 1 लाख 15 हजार रुपये जमा करुन शैक्षणिक साहित्य खरेदी करुन डिजीटल क्लासरुम उभारण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्की बुद्रुक ता फलटण येथील शाळेतील विद्यार्थ्यांना डिजीटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध होवून ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना भविष्यात वाटचाल करताना अडचण येवू नये या उद्देशाने शाळेचे माजी विद्यार्थी व हितचिंतक आणि गावातील ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून आथिक मदत जमा करून शाळेतील एक वर्गातील डिजीटल क्लासरुम सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्की बुद्रुक येथील लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक डिजीटल साहित्य लोकार्पण सोहळ्यास शाळेचे माजी विद्यार्थी आर्थिक मदत करणारे देणगीदार व ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आदर्की बुद्रुक शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.