फलटण दि. १० : सन्मित्र गणेशोत्सव मंडळ नाना पाटील चौक फलटण येथील मंडळाच्या श्री गणेश मूर्ती व मंडळास सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. तेजस्विनी सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली आणि मंडळ राबवित असलेल्या विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. तेजस्विनी सातपुते या श्री गणेशोत्सव उत्सव कालावधीमध्ये शहर व तालुक्यातील श्री गणेशोत्सव निमित्ताने पाहणी करण्यासाठी आज (मंगळवार दि. १० सप्टेंबर) रोजी फलटण येथे आल्या होत्या. यावेळी फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाना पाटील चौक येथील सन्मित्र गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची व परिसरातील पाहणी यावेळी सौ. तेजस्विनी सातपुते यांनी करुन समाधान व्यक्त केले. समाजातील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांना समाजातील तरुणांनी सहकार्य करावे असे आवाहन सौ. तेजस्विनी सातपुते यांनी केले.
फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये गेली ५८ वर्षापासून श्री गणेशोत्सव उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सन्मित्र गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सामाजिक शैक्षणिक उपक्रम याबरोबरच आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते. पालखी सोहळा अन्नदान मॅरेथॉन स्पर्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर यांनी सांगितले.
प्रारंभी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. तेजस्विनी सातपुते यांचे सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास प्रतापसिंह निंबाळकर विकास थिटे प्रकाश गरुड संकेत खामकर अमोल पवार नितीन फडतरे पुनीत आस्वानी स्वप्नील चव्हाण शिवराज निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.