फलटण येथील वरदराज शेती विकास केंद्र शेतकरी यांचेसाठी वरदान : शरद निंबाळकर

फलटण दि. १० : फलटण शहर व तालुक्यातील शेतकरी यांच्या हितासाठी आधुनिक व सव सुविधांनी उपयुक्त असे शेती व शेतकरी यांच्या सेवेसाठी मे वरदराज शेती विकास केंद्र, भवानी मार्केट एस. टी. स्टण्डसमोर फलटण येथे भव्य दालन सुरु केले आहे. वरदराज शेती विकास केंद्र शेतकरी यांना वरदान ठरत असून कषी क्षेत्रातील एक नामांकित दालन बनले असल्याचे शरद निंबाळकर यांनी सांगितले.
विंचुर्णी ता. फलटण येथील निंबाळकर कुटुंबिय व्यवसाय उद्योगनिमित्त गेली अनेक वर्षे फलटण शहरांमध्ये राहत आहेत. शरद निंबाळकर यांचे शिक्षण एम. एस्सी. अग्रीपयंत झाले असून त्यांचे दोन्ही बंधू व स्वतः  सुमारे १० वर्षापूर्वी फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मे. वरदराज शेती विकास केंद्र सुरु करुन तालुक्यातील व बाहेरील शेतकरी यांना सव नामांकित कंपन्यांची किटकनाशके बुरशीनाशके तणनाशके व विद्राव्य खते एकाच ठिकाणी व योग्य दरात उपलब्ध करून दिली आहेत. नामांकित कंपन्यांचे संकरीत मका बाजरी गहू व भाजीपाला बियाणे येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सव पिकावरील किड व रोगांचे अचुक निदान करुन औषधांची विक्री अत्यंत माफक दरात शेतकरी यांना केली जाते. ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकरी शेती व शेती क्षेत्रातील संबंधित विविध सल्ला व मार्गदर्शन तज्ञ सल्लागार यांच्यामार्फत दिला जातो. ग्राहक येथे शेती क्षेत्रातील औषधे बियाणे खते व सल्ला घेणेसाठी आल्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. संपूर्ण संगणकीकृत व्यवस्थापन येथील ग्राहकांना उपलब्ध करून दिले असल्याचे शरद निंबाळकर यांनी सांगितले.
मे. वरदराज शेती विकास केंद्र हे फलटण शहर व तालुक्यातील शेतकरी, शेती व शेतीशी संबंधित सर्वाना वरदान ठरत असल्याची ग्वाही शरद निंबाळकर यांनी दिली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!