साईबा अमृततुल्यची ९५ वी शाखा वाई येथे सुरू करण्यात येणार

फलटण दि. ९ : चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा हवाचं हे ब्रीद वाक्य असलेल्या साईबा अमृततुल्य  ची ९५ वी शाखा बुधवार दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रज्ञा एम्पायर तहसिल कार्यालयासमोर वाई येथे वाई खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंद (आबा) पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती युवराज ढमाळ व विजयसिंह शिंदे यांनी दिली.
या समारंभास सातारा जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, वाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
मराठी युवा उद्योजक अमोल इचगे व मंगेश कल्याणकर यांनी बालाजीनगर (पुणे) येथे साईबा अमृततुल्य ची पहिली शाखा सन २०१८ साली सुरू केली. पुणे सारख्या शहरात प्रथम शाखा ६० स्क्वेअर फुटामध्ये सुरू केल्यानंतर चहाची उत्तम चव व क्वालिटी ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबरोबरच विनम्र व तत्पर सेवेमुळे साईबा अमृततुल्य अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. 
साईबा अमृततुल्य ला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने मराठी युवा उद्योजक अमोल इचगे व मंगेश कल्याणकर यांनी मागे वळून न पाहता साईबा अमृततुल्य च्या शाखा महाराष्ट्र राज्यात सुरू केल्या. आज  २२४ शाखांचे बुकींग झाले असून वाई येथील साईबा अमृततुल्य ची ९५ वी शाखा सुरू होत असल्याचे सांगण्यात आले. 
युवराज विलासराव ढमाळ यांचे शिक्षण पदवीधर झाले आहे तर विजयसिंह आनंदराव शिंदे यांचे शिक्षण पदवीधर झाले असून या दोन्ही युवा मराठी उद्योजक यांनी  नोकरीच्या मागे न लागता वाई शहरात साईबा अमृततुल्य ची शाखा सुरू केली आहे. 
वाई येथील साईबा अमृततुल्य च्या  ९५ व्या शाखा शुभारंभ समारंभास वाई शहर व तालुका आणि सातारा जिल्ह्यातील चहाप्रेमी नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!