मंगळवेढा दि. ३ : शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडी मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांच्यावतीने तहसिल कार्यालय पुरवठा विभाग यांना नवीन व जुन्या भगव्या व पिवळ्याकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन देऊनही त्यांची दखल न घेतल्याने बुधवार दि. ११ सप्टेंबर रोजी मंगळवेढा तहसीलदार कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हाध्यक्षा विजयालक्ष्मी मुढे,
तालुकाध्यक्ष किर्तीताई अशोक सुतार यांनी सांगितले. नवीन व जुन्या भगव्या व पिवळ्याकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यात यावे आणि लवकरात लवकर रेशन धान्य उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मंगळवेढा प्रांताधिकारी कार्यालयातील प्रभारी अधिकारी महादेव भगरे यांना देण्यात आले.
मंगळवेेढा तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाने रेशन दुकानदार यांना आदेश पारीत करून नवीन व जुन्या कार्डधारकांचा नव्याने सर्व्हेक्षण करून नवीन आणि जुन्या कार्डधारकांचा यादीत समावेश करून गहू, तांदूळ, साखर, तेल, डाळ व हरभरा डाळ या सर्व वस्तू रेशन दुकानातून वाटप करण्यात याव्यात या मागण्यांचे निवेदन दि. 07 आगस्ट रोजी देऊनही संबंधित विभागाने आम्हाला रेशन धान्य उपलब्ध करून न दिल्याने आम्हीला न्याय द्यावा अशी मागणी केली होती तथापि या निवेदनाची दखल घेतली नसल्याने आम्ही बुधवार दि.११ सप्टेंबर रोजी मंगळवेढा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विजयालक्ष्मी मुढे, मंगळवेढा तालुकाध्यक्षा सौ किर्तीताई अशोक सुतार, मंगळवेढा शहराध्यक्षा रेखाताई भंडारे ,ओ.बी.सी सेल अध्यक्षा आयेशा शेख, विजयालक्ष्मी भालेराव, उज्वला चव्हाण,धनाजी लेडवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.