फलटण दि. ४ : श्रीनाथ प्रतिष्ठान व कृषिक्रांती ऍग्रोप्रोड्युसर कंपनी फरांदवाडी ता.फलटण यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यावर्षीच्या समाज भुषण पुरस्काराचे वितरण व ह.भ.प निवृत्तीनाथ महाराज देशमुख(इंदुरीकर) यांचे समाज प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन शुक्रवार दि 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा मयुरेश्वर मंगल कार्यालय फरांदवाडी येथे करण्यात आले असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्रीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना श्रीमंत रामराजें नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणारआहेत. ना श्रीमंत रामराजें नाईक निंबाळकर व ह भ प निवृत्तीनाथ महाराज देशमुख(इंदुरीकर) यांच्या शुभहस्ते शंकरराव कृष्णराव बोराटे (माळी गुरुजी) यांना “समाज भुषण” पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी फरांदवाडी पंचक्रोशीतील विशेष गुणवत्ता मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. फरांदवाडी कृषिक्रांती ऍग्रोप्रोड्युसर कंपनी निर्मित “साईसोना” शेहूर गहू विक्रीचा शुभारंभही यावेळी मान्यवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा व निवृत्तीनाथ महाराज देशमुख(इंदुरीकर) यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनाचा लाभ फरांदवाडी ता. फलटण व फलटण शहर परिसरातील ग्रामस्थ भाविक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्रीनाथ प्रतिष्ठान व फरांदवाडी कृषिक्रांती ऍग्रोप्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी व सभासदांच्यावतीने करण्यात आले आहे.