फलटण दि. २५ : ज्ञानज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुणे संचलित प्रिस्टाईन इंग्लिश मिडीयम स्कूल सर्कलवाडी ता. कोरेगाव जि .सातारा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दहिहंडी (गोपाळकाला) उत्सव साजरा करण्यात आला.
जन्माष्टमी निमित्त आयोजित उत्सवासाठी स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवत उत्साहात श्रीकृष्णाच्या गाण्यावर भिजत आणि नाचत कार्यक्रमाचा आनंद लुटला. भारतीय सण, उत्सव व संस्कृतीची जोपासना करणे ही काळाची गरज असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून डान्सचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल युगात विद्यार्थ्यांना प्रत्येक सणांची माहिती आणि ओळख करून देणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचत सलामी दिली. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. उत्सवात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कपडे परिधान केले होते. विद्याथ्यांनी आकर्षक राधा, कृष्ण, सवंगडी अशी विविधतेने नटलेली सर्व रुपे घेतली होती. कृष्णरुप धारण केलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यानंतर प्रसाद वाटण्यात आला.
स्कूलमधील अभिजीत लेभे, रुपाली भागवत ,निलम पवार , अनिता साळुंखे , श्रद्धा चव्हाण ,प्रिया दुधाने रवि पवार, राजेंद्र पवार, प्रगती पवार, प्राजक्ता निकम यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वीयशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.