फलटण दि.२५ : कोळकी येथील उत्कर्ष ग्रुप आयोजित राजे ग्रुप दहिहंडी उत्सवाचे गोकुळाष्टमी निमित्त गाण्यांच्या तालावर ठेका धरून दहीहंडी कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी दहीहंडीचा शुभारंभ मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गोविंदा आला रे आला यासारख्या गाण्याच्या तालावर गोविंदानी नृत्य सादर करीत पाण्याचा मारा झेलत गोविंदानी थर लावून दहीहंडी फोडली.