फलटण दि. २५ : येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम विदयाभवन प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी निमित्त सकाळ व दुपार विभागातील मुलांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरून दहीहंडी कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला.
प्रारंभी सकाळ विभागातील इ.१ ली ते ४ थी व दुपार विभागात इ.५ वी ते ७ वी या दोन्ही विभागातील दहीहंडीचा शुभारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गोविंदा आला रे आला यासारख्या गाण्याच्या तालावर मुलींनी दांडिया नृत्य सादर केले. पाण्याचा मारा झेलत इ ५ वी ते ७ वीच्या मुलांनी थर लावून दहीहंडी फोडली. यानंतर मुलांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
कृष्णाची वेषभूषा करून दहीहंडी फोडण्याचा मान जीत ठाकूर याला देण्यात आला. शेवटी खाऊ वाटप करण्यात आले.पालक वसंत चव्हाण यांनी मुलांसाठी खाऊसाठी मदत केली. दहीहंडी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.