फलटण : मंगळवार पेठ येथील विविध कामांचा शुभारंभ नगरसेविका वैशाली सुधीर अहिवळे, नगरसेवक सनी संजय अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग 2 मधील नगरसेविका वैशाली सुधीर अहिवळे व नगरसेवक सनी संजय अहिवळे यांनी प्रभागा मधील नागरीकांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती व उद्घाटन समारंभ काल दि 10 रोजी आयोजित करण्यात आला होता.
मंगळवार पेठ येथील विविध कामांचा शुभारंभ संपन्नसंस्कृतीक
भीम नगर येथे शौचालय बांधणे, समाज मंदीर येथे वाचनालय बांधणे, माने हाॅटेल ते गरवलीया काॅम्पलेक्स काॅक्रेट रस्ता करणे, खंडोबा मंदीर ते राजू काकडे घर काॅक्रेट रस्ता करणे, बुद्ध विहार सुशोभिकरण करणे व भिंत कंपाउंड बांधणे या कामाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सुपर्णा सनी अहिवळे, सुभाष अहिवळे, सुधिर अहिवळे, शिवा अहिवळे, शक्ती भोसले, रविदादा गायकवाड, मिलिंद काकडे , मंगेश जगताप, उमेश अहिवळे, सनी मोरे, हरि महामुलकर, राम अहिवळे इतर सर्व मान्यवर व मंगळवार पेठेतील वार्ड क्र. २ मधील नागरिक उपस्थित होते.