फलटण : आजपर्यंत केवळ शरद पवारांच्या प्रेमापोटी खा. उदयनराजें सोबतचा मतभेद विसरून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीत थांबले होते. केवळ रामराजे यांचे सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर असणारे वर्चस्व या राजकिय द्वेषापोटी खा. उदयनराजे यांनी अनेक वेळा खालच्या पातळीवर जाऊन रामराजे यांच्यावर जहरी टिका सातत्याने केली होती. ती टिका सहन करण्याची परिसिमा संपल्याने त्यांनी फलटण मध्ये मध्यंतरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ,शरद पवार साहेबांना आवाहन व विनंती केली की, ” उदयनराजे यांना आवरा अन्यथा आम्हाला दुसऱ्या पक्षात जाण्याची परवानगी द्या,’ असेही सांगून बघितले. मात्र, शरद पवारांनी त्यांच्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. व उदयनराजेंचीच पाठराखण झाल्याने शेवटी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठोपाठ आता रामराजे नाईक निंबाळकरही भाजपवासी होण्याच्या दिशेने निघाले आहेत अशी जोरदार चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. त्यांच्या प्रवेशासाठी थेट दिल्लीतून वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हालत असून येत्या १० ते १५ दिवसांत रामराजे भाजपमध्ये दिसल्यास नवल वाटायला नको.
मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी थेट दिल्लीतून प्रयत्न, त्यांच्या भाजपप्रवेशाचीच जोरदार चर्चा
सत्ता कोणात्याही पक्षाची असो फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्रीपद मिळाले आहे. अगदी अपक्ष निवडून आले तरी ते मंत्री झाले. आता ते राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषदेचे सभापती पदावर आहेत.
केंन्द्रात सध्या भाजपाचे सरकार बहुमताने नुकतेच निवडून आले आहे. त्या अनुषंगाने राज्यात देखील भाजप शिवसेनेचेच सरकार सत्तेवर येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे युतीमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेतेमंडळीं व आमदारांचे इनकमिंग जोरात सुरू आहे. अजून हि माढ्याचे आ. बबनदादा शिंदे, बार्शीचेआ. दिलीप सोपल,पंढरपूरचे आ.भारत बालके, अक्कलकोटचे आ.सिध्दराम म्हेत्रे इ.आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. तसेच सांगलीतली अनेक वरिष्ठ नेतेमंडळीं युतीमध्ये जाणार असल्याचे समजते त्या पार्श्वभूमीवर मा.ना.श्रीमंत रामराजे ना निंबाळकर यांच्यावर त्यांच्या मतदार संघातील अनेक कार्यकर्ते यांचा पक्षबदलासाठी दबाव वाढत असल्याने रामराजे काय निर्णय घेणार यावर बरेच काहि अवलंबून आहे.
रामराजे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला तर प.महाराष्ट्रातील एक मोठा नेता भाजपाच्या हाताला लागेल. व त्यामुळे सातारा जिल्हातील व माढा लोकसभा मतदार संघातील बरीच राजकिय समीकरणे बदललेली दिसतील श्रीमंत रामराजे यांचे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत निर्वीवाद वर्चस्व राहिले आहे. मग ते जिल्हा बॅक असो किंवा जिल्हा परिषद, यामध्ये श्रीमंत रामराजे सांगतील तेच होत आलेले आहे.
श्रीमंत रामराजे यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे पश्चिम महाराष्ट्रात आहे. विशेष करून श्रीमंत रामराजे ना निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे माण- खटाव विधानसभा, वाई – खंडाळा विधानसभा , कोरेगाव विधानसभा, फलटण विधानसभा या मतदार संघातील विधानसभेच्या निवडणूकीत हि बदल अपेक्षित आहेत. कारण या भागात श्रीमंत रामराजे यांची काम करण्याची पध्दती वेगळी आहे. आलेल्या कार्यकर्त्याला ते कधीच नाराज करित नाहीत त्यामुळे त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे संघटन भक्कम व मजबूत आहे.
नेमके रामराजे आता राष्ट्रवादीत राहणार की भाजपा शिवसेनेची वाट धरणार हे लवकरच आगामी काळात स्पष्ट होणार आहे.