फलटण : श्रीराम बझार सहकारी ग्राहक संस्था फलटण येथे मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम दिनांक ०१/०४/२०१९ रोजी संपन्न झाला. राष्ट्रीय महोत्सव सुरू असून लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यातील मतदान दिनांक २३ एप्रिल २०१९ मतदान करण्याची संधी गमावू नका असा संदेश या कार्यक्रमा मध्ये देण्यात आला. मा संतोष जाधव उपविभागीय अधिकारी तथा दंडाअधिकारी फलटण,मा हणुमंत पाटील तहसीलदार मा अनंत गवारे नायब तहसीलदार फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली २५५ फलटण मध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू आहे.
या कार्यक्रमात मा किशोर माने सहा. गटविकास अधिकारी तथा स्वीप पथक प्रमुख अधिकारी
फलटण ,यांनी यावेळी भारत निवडणूक आयोग मार्फत मतदान जनजागृती मोहीम चे उद्देश तसेच २३एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बाजावण्या बाबत यावेळी उपस्थित मतदारांना आव्हान केले. तसेच यावेळी सचिन जाधव तलाठी यांनी ई व्ही एम मशीन व व्ही व्ही पॅट बद्द्ल संपूर्ण माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखवले.या कार्यक्रमात मतदान जनजागृती प्लेक्स लावण्यात आले होते यावेळी श्री सचिन जाधव कृषी सहाय्यक स्वीप सहायक अधिकारी यांनी मतदान जनजागृती बाबत माहिती व मतदान जनजागृती प्लेक्स चे वाचन केले. श्री.धेंडे तलाठी श्री.किरण उदमले कृषि अधिकारी पंचायत समिती तथा गट स्वीप सहाय्यक अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.यावेळी फलटण तालुक्यातील ग्राहक वर्ग व श्रीराम बजार मधील अधिकारी कर्मचारी,महिला वर्ग मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते