फलटण तालुका खुल्या हॉलीबॉल स्पर्धा
फलटण टुडे वृत्तसेवा ( ताथवडा दि . 24 ):-
ताथवडा येथे नुकत्याच झालेल्या फलटण तालुका खुल्या हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाच्या मुलांच्या हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले.
या संघामध्ये हर्षल मदने,आदित्य धुमाळ, पियुष फडतरे,रोहित करंजकर,कुणाल भोसले, अथर्व फडतरे,गौरव धर्माधिकारी,सनी गावडे, प्रणव खरात, स्वप्नील शेलार या खेळाडूंनी संघाचे प्रतिनिधित्व केले.
या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम यांनी सर्व संघाचे अभिनंदन केले.