बारामती मध्ये प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र जलतरण तलाव होणार: डॉ अशोक तांबे

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –

प्रतिनिधीमहिलांना सुद्धा जलतरण तलाव उपलब्ध व्याहवा, मुली, महिला जलतरणपटू व्याहव्यात विविध स्पर्धा मध्ये त्यांना सहभागी होता यावे व व्यायाम व आरोग्य मिळावे आदी साठी बारामती तालुक्यातील पहिला जलतरण तलाव चे काम लवकरच सुरू होणार असल्याचे वीर सावरकर जलतरण तलाव चे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी सांगितले.वीर सावरकर जलतरण तलाव ची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली या वेळी डॉ अशोक तांबे यांनी सदर माहिती दिली या प्रसंगी वीर सावरकर जलतरण तलाव चे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर, सचिव विश्वास शेळके ,खजिनदार मिलिंद अत्रे, संचालक अमोल गावडे, बाळासाहेब टाटिया ,अनिल सातव, दीपक बनकर, पंढरीनाथ नाळे, डॉ गीता व्होरा, कु शर्मिष्ठा जाधव, सल्लागार सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, राजेंद्र जाधव, महेंद्र ओसवाल व सभासद, जलतरण खेळाडू ,पालक उपस्तीत होते.या प्रसंगी देशातील व परदेशातील विविध जलतरण स्पर्धेत यशस्वी जलतरण पट्टू वरदा कुलकर्णी,श्रीनीची कुलकर्णी, जुमेद शेख, ऐश्वर्या घोरपडे, दिग्विजय नलवडे ,आदिराज कुलकर्णी ,शौर्य खंडाळे ,अंकुर खंडाळे ,शौर्य राजे निंबाळकर ,महमद साद तांबोळी, शिरीष कुमार शिंदे, विश्वजीत गोलांडे, मनोज गोलांडे व विविध क्षेत्रात यशस्वी झालेले सभासद प्रा देविदास गुरव ,छगन लोणकर, संभाजीराव जगदाळे, किरण शिरसागर, लालासाहेब गोलांडे, कैलास घोडेकर, दयानंद कोकरे आदी चा सन्मान करण्यात आला.सभासदाच्या आरोग्यासाठी व गुणवंत व होतकरू जलतरण पट्टू तयार व्याहवेत या साठी कटीबद्ध असल्याचे सचिव विश्वास शेळके यांनी सांगितले आभार व्यवस्थापक सुनील खाडे यांनी मानले.फोटो ओळ: राष्ट्रीय विशेष खेळाडू वरदा कुलकर्णी हिचा सत्कार करताना मान्यवर

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!