एमआयडीसी येथे धनंजय भाऊ मुंडे दहीहंडी चषक महोत्सव संपन्न

फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी)ः-

बारामती एमआयडीसी येथील वंजारवाडी युथ फेस्टिवल चा धनंजय भाऊ मुंडे दहीहंडी चषक, दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.२८ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव मध्ये बारामती, इंदापूर तालुक्यातील दहीहंडी स्पर्धकांनी भाग घेतला या उत्सवाचे आयोजन पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार बारामती यांच्या माध्यमातून करण्यात आले.दहीहंडी महोत्सव चे उदघाटन युवा नेते जय अजित पवार यांनी केले. तर बक्षिस वितरण भगवान बाबा युवा सेना चे प्रदेश अध्यक्ष माणिकराव फड यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वणवे, उपसरपंच सागर दराडे व दत्तात्रय डोंबाळे, शरद चौधर, नितीन चौधर, जितेंद्र वीरकर, राहुल शिरसट,अजित चौधर, गणेश चौधर, समीर चौधर, विशाल चौधर, आकाश सूर्यवंशी, मयांक ओमासे “पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोपालांच्या धाडसाला हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून व दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले जाते ही कौतुकास्पद बाब असल्याचे ” माणिकराव फड यांनी सांगितलेया प्रसंगी अभिनेत्री मनीषा शिंदे व इतर इतर नृत्यांगना यांनी दहीहंडी च्या हिंदी मराठी गाण्यावर नृत्य केले.गुणवडी येथील जय भवानी दहीहंडी संघांनी ५ चा स्थर लावून दहीहंडी फोडली व धनंजय भाऊ मुंडे चषक पटकाविला.पेन्सिल चौकामधील दहीहंडी पथकांचा थरार पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची व पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्तिथी होती.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सागर दराडे यांनी मानले फोटो ओळ:विजेत्या संघाचा सन्मान करताना माणिकराव फड व इतर मान्यवर

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!