नेहरू चषक हॉकी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार मा. डॉ. अभिजीत जाधव, किरणराव बोळे, महेश खुटाळे, प्राचार्य श्री.सुधीर अहीवळे, मा.श्री.रवी पाटील, श्री स्वप्निल कांबळे पाटील व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. 30 ) :-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 ऑगस्ट 2024 म्हणजेच ध्यानचंद डे हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धांचे उद्घाटन व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष फलटण तालुक्याचे तहसीलदार मा. डॉ. अभिजीत जाधव व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून फलटण तालुका दैनिक सकाळचे प्रतिनिधी मा.श्री. किरणराव बोळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तसेच निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी मा. श्री महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य मा. श्री.सुधीर अहीवळे, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी मा.श्री.रवी पाटील व माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू मा. श्री स्वप्निल कांबळे पाटील, मा. श्री डी एन जाधव, मा. श्री अमोल सपाटे, मा. श्री अमोल नाळे, मा. श्री बापूराव सूर्यवंशी, मा. श्री शंकरराव तडवी व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख व हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ यांनी केले. प्रास्ताविका मध्ये मेजर ध्यानचंद यांचा जीवन परिचय करून दिला व 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून का साजरा केला जातो याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय खेळाडू कु. श्रेया चव्हाण कु. निकिता वेताळ, कु. शिफा मुलानी, कु.सिद्धी केंजळे, कु. वेदिका वाघमोरे, कु.गायत्री खरात, कु. मानसी पवार, कु. अनुराधा ठोंबरे, कु.अनुष्का केंजळे, कु. सिद्धी काटकर व विद्यापीठ खेळाडू विनय नेरकर, ऋषी पवार , अथर्व पवार, यश खुरंगे ,प्रतीक झणझणे, योगेश धामणेरकर, राज मोरे, अभिजीत धुमाळ, मुकुल खुटाळे, यश साबळे यांचा सत्कार फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव व फलटण तालुका दैनिक सकाळचे प्रतिनिधी मा. श्री.किरणराव बोळे , मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री.सुधीर अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर नेहरूकप हॉकी स्पर्धा १७ वर्षाखालील मुले/ मुली व १५ वर्षाखालील मुले या वयोगटामध्ये घेण्यात आल्या. त्यामध्ये के एस डी शानबाग सातारा, सैनिक स्कूल सातारा, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, संजीवन विद्यालय पाचगणी व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडिअम (सी बी एस इ.) स्कूल जाधववाडी फलटण यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बी.बी.खुरंगे यांनी केले तर आभार श्री सचिन धुमाळे यांनी मानले