जय मल्हार दहीहंडी संघ सहेली फौंडेशन चा मानकरी

खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करताना रोहिणी खरसे आटोळे व सहेली फौंडेशन च्या सहकारी महिला

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) :-


शनिवार दि.३१ ऑगस्ट रोजी डोर्लेवाडी येथे सहेली फाउंडेशन च्या अध्यक्षा रोहिणी खरसे आटोळे व सहकारी महिलांच्या वतीने पार्थदादा दहीहंडी उत्सव २०२४ वहिनी साहेब चषक चे आयोजन करण्यात आले होते गुणवडी येथील जय मल्हार दहीहंडी संघाने सदर दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला .
या प्रसंगी खासदार सुनेत्रा पवार,सिने अभिनेत्री मुग्धा कर्णिक, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत,
पिंपळीच्या सरपंच स्वाती ढवाण,डोर्लेवाडीच्या सरपंच सुप्रिया नाळे, उपसरपंच विश्वजीत घोडे, अविनाश काळकुटे, शैलेश बाबा जाधव,दिलीप चौधरी
आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांनी आयोजित केलेली बारामती मधील पहिली दहीहंडी असून रस्त्यावरील दहीहंडी मैदानात आणून त्याला खेळाचे स्वरूप प्राप्त करून देणे व ग्रामीण भागातील गोविंदांना प्रोत्साहित करण्यासाठी सदर दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केल्याचे सहली फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिणी खरसे आटोळे यांनी सांगितले.
वृक्षारोपण ,रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप,महिलासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सहेली फाउंडेशनने स्वतःच वेगळेपण सिद्ध केल्याचे खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
पारु फेम अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी मालिकेतील विविध संवाद सादर करत,अभिनय क्षेत्रातील प्रवास सांगितला.
या प्रसंगी जय मल्हार संघ उंडवडी,
जय भवानी संघ गुणवडी,
जय मल्हार संघ गुणवडी,
जय श्रीराम कसबा बारामती या चार गोविंदा पथकाने दहीहंडी महोत्सवामध्ये सहभाग घेतला.उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट नृत्य या बदल विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन श्रीअनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार हरिभाऊ आटोळे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!