पुणे जिल्हा बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्हा बँकेचा वर्धापन दिन साजरा करताना सभासद व अधिकारी,कर्मचारी

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती )

:प्रतिनिधीपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वर्धापन दिन बारामती शहर शाखा यांच्या वतीने सोमवार २ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने बँक खातेदार,सभासद,ठेवीदार,शेतकरी यांना आमंत्रित करण्यात आले होते.बँकेचे ज्येष्ठ सभासद व माळेगाव कारखान्याचे मा. संचालक दिलीप ढवाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व उपस्थित ज्येष्ठ सभासद यांचा सत्कार करण्यात आला.विभागीय अधिकारी संदीप जगताप यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला . या प्रसंगी बँकेतील रणजीत देवकाते ,संजय जगधने, धनंजय जाधव, निखिल देवकाते, रंजीत जगताप, विजय गायकवाड, अजय पळसे, महेश नलावडे, शुभम माने, विकास पवार, निखिल भिसे, हर्षवर्धन सातव , विमल गायकवाड, अनुराधा बगाडे, स्नेहा मेरगळआदी उपस्तीत होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!