विजेत्या संघा बरोबर शिक्षक वृंद
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) : –
.रविवार, दि. १ सप्टेंबर, रोजी , लोणी काळभोर या ठिकाणी आयडीयल प्ले अबॅकस इंडिया प्रा.लिमिटेड आयोजित १८ वी महाराष्ट्र स्टेट लेव्हल अबॅकस व मेंटल अरिथमॅटिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेमध्ये ज्ञानसागर गुरुकुल मधील ११ विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यामध्ये फैजान फारुक पठाण – प्रथम (इ. ४ थी ) दुर्वा शरद सूळ – द्वितीय (इ. ६ वी ) आर्या नितीन थोरात – द्वितीय (इ. ८वी) आयुशी भरत जगताप – द्वितीय ( इ. ४थी ) आयुष दादासाहेब देवकाते – द्वितीय ( इ ५ वी ) श्रीराज भाऊसाहेब देवगुंडे – द्वितीय (इ. 3री ) सानवी अमोल गुळवे – तृतीय (इ. 8वी ) प्रेम दादासाहेब देवकाते – तृतीय ( इ 8 वी ) श्रावणी अंबादास बोराडे – तृतीय (इ. 4थी) आराध्य रामदास क्षीरसागर – तृतीय (इ. 4थी ) साईराज दिलीप माने – तृतीय (इ. 4थी ) या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अबॅकस प्रशिक्षिका ज्योती ढाले आणि कीर्ती रसाळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. ज्ञानसागर गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्ष रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दीपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे, नीलिमा देवकाते, राधा नाळे,निलम जगताप, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.