फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ७ ) :-
जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहेली ग्रुपच्या वतीने श्रमिक महिला वसतिगृहाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी सहेली ग्रुप फलटणच्या सन्माननीय अध्यक्षा मा. श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकरया उपस्थित होत्या त्यांच्या शुभहस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले .आपल्या देशाचे नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जागतिक तापमान वाढ हा विषय गंभीर बनला असून या विषयावर वेळी तोडगा काढायचा असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन ही मोहीम हातात घेणे काळाची गरज आहे . तसेच जागतिक तापमान वाढीमुळे पाऊस, भूकंप , ज्वालामुखी चा , तीव्र दुष्काळ , वादळे, उष्णतेच्या लाटेची शहराची वाढती तापमान पातळी, वितळणाऱ्या हिमननद्या आणि तापमान वाढल्यामुळे महासागरातील प्राण्यांना थेट हानी पोहोचू शकते . तसेच त्याची राहण्याची ठिकाणे नष्ट होऊ शकतात आणि लोकांच्या जीवनमानाचा आणि समुदायांचा नाश करू शकता इत्यादी गंभीर परिणाम जागतिक तापमान वाढीमुळे होऊ शकतात त्यावर एक मात्र उपाय म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करून या वृक्षांचे संवर्धन करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेफलटण येथील श्रमिक महिला वस्तीगृहाच्या आवारात जायंट्स ग्रुप ऑफ सहेली च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सहली ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व पदाधिकारी यांनी वृक्षारोपण केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांना यावेळी गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या… यावेळी सहेली ग्रुपच्या उपाध्यक्षा सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, पी.आर.ओ.सौ.वैशाली चोरमले, संचालिका सौ.लतिका अनपट, सौ.मेधा सहस्रबुद्धे, श्रीमती विद्या गायकवाड़ ,सौ. प्रतिभा शहा सौ.प्राची फडे, कार्यवाह सौ.राजश्री शिंदे आणि वसतिगृहाच्या अधिक्षक शेख मॅडम उपस्थीत होत्या.अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली