फ
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ) :-
गणेशोत्सव – २०२४ च्या अनुषंगाने दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी फलटण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांचीबैठक घेऊन, गणेशात्सवाचा आनंद समाजातील सर्व जनतेस आनंदाने घेण्यात यावा आणि सदर उत्सव शांतता,सलोख्याने, सामंजस्याने पार पाडावा, यासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापराच्या मार्गदर्शनासहीत अन्य सुचना दिलेल्या होत्या.या पार्श्वभुमीवर दि. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी फलटण शहरात श्री गणेश चतुर्थीच्या निमीत्ताने अनेक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेश मुर्तीच्या आगमनाच्या प्रित्यर्थ मिरवणुका काढल्या होत्या. या मिरवणुकांमध्ये खालील मंडळांनीध्वनीक्षेपकाचा अनियंत्रितपणे वापर केल्याने, त्यांच्या विरुध्द कलम 36(इ-अ)/134 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.खाली दिलेल्या गणेशोत्सव मंडळावरती कारवाई करण्यात आली आहे त्या मंडळाची नांवे१)श्रीमंत जय श्रीराम गणेशोत्सव मंडळ, फलटण२)सोमवार पेठ तालीमगणेशोत्सव मंडळ, फलटण३) उमाजी नाईक चौकगणेशोत्सव मंडळ, फलटण४ ) दगडी चाळ गणेशोत्सवमंडळ, फलटण५) लक्ष्मीनगर येथील एकदंत गणेशोत्सव मंडळ, फलटण६ ) मोती चौक तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण७) छत्रपती शिवाजीनगर तालीमगणेशोत्सव मंडळ, फलटण८ )सिध्दीविनायक महागणपतीमंदिर गणेशोत्सव मंडळ फलटण९) बाल गणेश गणेशोत्सव मंडळ, फलटण१० ) अमर ज्योत गणेशोत्सव मंडळ जबरेश्वर मंदिर समोर फलटणवरील मंडळावर वरील कायद्याप्रमाणे कारवाई केल्या बरोबरच ध्वनीक्षेपकासाठी वापरण्यात येणारे ५ मिक्सर सेट ताब्यात घेतले आहेत.वरील कामगिरी सपोनि. नितीन शिंदे, पोह. चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, पो शि. मुकेशघोरपडे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके वगैरे यांनी सहभाग घेतला.आगामी कालावधीतही फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन कारवाई करण्यात येणार आहे.या पार्श्वभुमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांना आवाहनकरण्यात येते की, गणेशोत्सवाचा आनंद सर्व जनतेस आनंदात व उत्साहात घेता यावा, जनतेस त्रास होणार नाही आणि परवानगी मध्ये दिलेल्या क्षमतेच्या मर्यादे पर्यंतच धनीक्षेपकाचा आवाज नियंत्रीत ठेवावा, गणेशात्वाच्या निमीत्तानेविधायक किंवा लोकोपयोगी आणि आदर्श घेण्याजोगे तसेच मंडळाचे नावलौकिक वाढविणारे उपक्रम राबवावेत.