विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन हे अक्षर कवायती द्वारे तयार केले
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) :-
कटफळ येथील अजित दादा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये साक्षरता दिन साजरा करण्यात आला. निरक्षर लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांची भूमिका इयत्ता पाचवीतील कृष्णा संदीप चव्हाण व मयुरी म्हातारदेव खाडे या विद्यार्थ्यांनी साकारली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगितले .
तसेच हा महत्त्वाचा दिवस वाचन जागरूकता सुधारण्यासाठी, साक्षरतेला मूलभूत मानवी हक्क म्हणून हा दिवस साजरा केला जातो .व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व गरज समजावून सांगितले.
या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी देखील सहभाग नोंदवला सर्व नर्सरी एल.के.जी व एच.के.जी चे विद्यार्थी हे साक्षरता दिन या आकारात उभे राहून यांनी अप्रतिम कलाकृती सादर केली .त्यांना इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मदत केली.
हे सर्व उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वणवे यांच्या मार्गदर्शन व देखरेखी खाली पार पडले. कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.