फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. १३)ः-
इंदापूर जि.पुणे येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार(महसूल) अभिजीत सोनवणे यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून फलटण तहसील कार्यालय या ठिकाणी आज बदली झाली आहे.यापूर्वी अभिजित सोनवणे यांनी उपविभागीय कार्यालय फलटण येथे अव्वल कारकून म्हणून काम पाहिले होते. तर खंडाळा, सातारा,फलटण याठिकाणी शिरस्तेदार म्हणून सेवा बजावली आहे.सोनवणे यांची फलटण येथे निवासी नायब तहसीलदारपदी बदली झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.