विजयनगर मध्ये तृतीयपंथी यांचा सन्मान करताना मंडळाच्या सभासद छाया उगले
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
बारामती तालुक्यातील तृतीय पंथीना मुख्य प्रवाहात सामावून घ्या, मान व सन्मान द्या ,माणुसकीची वागणूक द्या असा संदेश देत त्यांचा सन्मान करून त्यांना श्री च्या आरतीचा मान देऊन विजयनगर युवा प्रतिष्ठान ने आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. सोमवार दि.१६ सप्टेंबर रोजी बारामती शहरातील विजयनगर युवा प्रतिष्ठान ने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमच्या च्या शुभारंभ प्रसंगी तृतीयपंथींचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी चंदू काका सराफ चे मार्केटिंग प्रतिनिधी विनोद जगताप, सचिन मोहिते, विविध क्षेत्रातील मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.तृतीयपंथी हे सुद्धा माणसेच आहेत त्यामुळे त्यांचाही आदर मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या मानाचे स्थान द्या असेही तृतीयपंथांचे प्रमुख रितेश साबळे यांनी सांगितले.या प्रसंगी जोगवा या चित्रपटातील गीतावर त्यांनी सुंदर नृत्य केले.त्यांचा जीवन प्रवास उलगडणारी मुलाखत श्री सावळेपाटील यांनी घेतली .आगळावेगळा कार्यक्रम मानसन्मान मुलाखत नृत्य यामुळे भारवलेल्या तृतीयपंथनी मंडळाचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.चौकट: सामाजिक बांधिलकी म्हणून तृतीय पंथी यांचा सन्मान करणे हा उपक्रम तालुक्यात प्रथमच सुरू करून त्यांना समाज्यात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करू व त्यांच्या साठी असलेल्या शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचवू : विजयनगर युवा प्रतिष्ठान बारामती