सायकल म्हणजे सहप्रवासी व रक्तवाहिनी : हरीश कुंभरकर

आजी आजोबा व त्यांची सायकल

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ):

प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार सुखदुःख असतात परंतु या सर्वांमध्ये कोणती एक वस्तू आपल्याला नेहमी साथ देत असते तसे माझ्या आजोबांच्या जीवनामध्ये सायकलने दिलेली समर्थ साथ सायकल म्हणजे सहप्रवासी सायकल म्हणजे रक्तवाहिनीस होते असे प्रतिपादन समर्थ उद्योगसमहाचे चेअरमन ऍड हरीश कुंभरकर यांनी केले.

बारामती परिसरातील आजोबांच्या आठवणी व त्यांचे योगदान मुळे बारामती एमआयडीसी मधील जमिनी राहिल्या व आता सोन्याची किंमत जमिनीला आल्या व नातवंड यांना याचा लाभ होत असताना तरुण पिढी ने त्याचा विसर पडू देऊ नये या विषयावर आयोजित चर्चा सत्र मध्ये ते बोलत होते.

या वेळी बारामती एमआयडीसी मधील अनेक उद्योजक वंजारवाडी रुई सावळ या परिसरातील भूमिपुत्र उपस्तीत होते .माझ्या सायकलच्या हॅंडलनं आज नेहमीची रूळलेली वाट सोडुन नव्या वाटेवर, वेगळ्या दिशेने धाव घेतली.. ह्याला अस्ताव्यस्त भटकणारा मेंदु व गोलाकार लयीत फिरणारे पॅंडलवरचे पाय खरे जबाबदार होय.. नियमित दिनचर्येला छेद दिला की काय तरी विशिष्ठ डोळ्यात भरते व आपला दृष्टीकोन अजुन रूंदावतो, नवा अनुभव पदरात पडतो.. बारकाईनं निरीक्षण होतं आणि ती पाहिलेली घटना व कल्पना काळजाला हळूच स्पर्श करते..

दोन खोल्यांचं पत्र्याचं घर, शहाबादी फरशीचा गुडघाभर उंचीचा ओटा व त्यावर निवाऱ्यासाठी स्लोप दिलेली बारगज. समोर अंगणात फळांची व इतर देशी झाडांची परमंनंट गर्दी, त्याच झाडांच्या पाना-फांद्यामधुन नुकत्याच डोकं वर काढलेल्या सुर्याची तिरकस किरणं अंगणातल्या भांड्या-कुंड्यांवर पडली होती, त्या दारातल्या पसाऱ्याला देखिल आजच्या नव्या रविकिरणांनी जागं केल्याचं भासत होतं. तांबड्या मातीचं व झाडांच्या सावलीतलं अंगण पाणी मारून स्वच्छ झाडलं होतं, ते उन- सावलीचं अंगण फांद्यामधुन उन्हं जमिनीवर आल्यानं ठिगळं लावलेल्या फाटक्या गोधडीगत दिसत होतं, दारात त्या आंबट ओल्या मातीवर झाडु-खराट्याच्या रेषा अजुन ताज्या होत्या…. अंगणात पेटलेल्या चुलीभोवती एक आजी डोईवरचा पदर सावरीत खटपट करीत असते, धुराच्या सान्निध्यात कळपटलेल्या पातेल्यात काहीतरी उकळत असेल, शेजारी चार खरकटी भांडी एकमेकांना चिकटुन तशीच पडलेली होती. ही वयस्क आजी पहाटे लवकर उठुन कामकाजाला लागते याचा तो सक्षम पुरावा होय. तशातही तिच्या राबणाऱ्या सुरकतलेल्या दोन्ही हातात काचेच्या रंगीत बांगड्या किंचित नाद करीत होत्या….

अंगात मातकट रंगाची दोन खिशाची कोपरी व कमरेला सोगा बांधुन घातलेले सुती धोतरवाले आजोबा जास्त आकर्षित करीत होते , ते आपल्या अनोख्या कामात मग्न होते. उंबऱ्याबाहेर चार वाव अंतरावर दोन झाडांना एका नायलॅान दोरीनं जोडलेलं, त्यावर लाल ठिपक्या ठिपक्याची हिरवट नऊवारी सुती साडी वाळत घालणाऱ्या आजोबांकडं नजर खिळुन राहते. पार थकलेल्या हाताने ते बाकदार दोरीवर साडी पसरवत असतात, असं करताना काखेपासुन कोपरापर्यंतची त्यांची दोन्ही हाताच्या दंडाची कातडी जमिनीकडं लोंबत असते. ती एकेकाळची त्यांची शारिरीक क्षमता अधोरेखित करीत होती . दोरीवरच्या साडीतनं नितळणारं, टिपकणारं पाणी आजोबांच्या पायाजवळ मातीत टपटप पडायचं व त्यातुन ओल्या मातीचे कण तुषारांसहित त्यांच्या पायाच्या पंजावर जमा व्हायचे अगदी टिपक्यांची मेहंदी काढल्यागत .. उंचावर दारात इलेक्ट्रीक च्या तीन तारा सिमेंटच्या दोन पोल ला झोंबलेल्या होत्या. त्यावर दोन रंगीत पक्षी एकमेकांकडे पाहुन आपुलकीनं काहीतरी हितगुज करीत होते.कधी ते एकमेकांपासुन रूसल्यासारखे दुर सरकायचे व क्षणात मंजुळ चीव-चीव करीत परस्परांना चिकटायचे . साडी वाळावी म्हणुन तिला दोरीवर व्यवस्थित सरकावणारे आजोबा व पेटत्या चुलीशेजारी पसारा घातलेली आजी साऱ्या जीवनाचा सार , अर्थ समजावुन जातात.. तिथं आजी-आजोबांनी एकमेकांच्या आयुष्याची वीण अशी सुरेख विणलेली दिसत होती, त्यांनी जगलेले दिवस आरशासारखे पारदर्शी दिसले. परस्परांविषयीची निस्वार्थ प्रेम , आत्मीयतेची भावना गोड मधाप्रमाणे ओघळतेय.. त्यांच्या त्या ठिकाणच्या वावरण्यात अखेरच्या श्वासापर्यंतचं वचन दिसत होतं, सहवासात निर्मळता भासत होती… जेव्हा आयुष्याचा उद्देश कळत नाही, जगतोय का ? याची उकल होत नाही.. आपल्या विचारांची भिती वाटते, आपण अस्ताला-अखेरीला चाललोय, जीवनाचे घोट पचवले जात नाहीत… अगदी अशाच वेळी सहज भटकताना रस्ता चुकावा व “सार्थ जगणं” काय ? या तिजोरीची एक चावी सापडावी..त्यातून आकलन व्हावं की…… आयुष्याचा प्रवासात “मानलं तर आयुष्य एकदम खुप कठिण नाही“ जाणलं तर… ”सहज सोप्पं पण नाही”… सोबती म्हणुन आपण जोडलेली नाती कायम समवेत असावी, ते संबंध आपले श्वासाप्रमाणे सहप्रवासी असावेत.. या जिंदगीची प्रतवारी, वर्गवारी, तुलना करण्यापेक्षा….शेवटपर्यंत-अखेरपर्यंत केवळ जगून घ्यायचं…. प्रत्येकाच्या जीवनातील सह प्रवासी ओळखा असेही ऍड हरीश कुंभारकर यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!