जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फलटण येथे 24 ते 26 सप्टेंबर

*फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. 20 ): –

सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत सर्व तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व आस्थांपनामध्ये कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सूनिल पवार यांनी केले आहे. सकाळी 10 ते 3 या वेळेत पुढील सर्व तालुक्यात नियोजित दिनांकास कार्य प्रशिक्षण उमेदवार निवड मेळावा घेण्यात येणार आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोळाचा ओढा, सातारा येथे 23 ते 27 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड येथे 20 ते 27 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणंद 24 ते 30 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फलटण येथे 24 ते 26 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औध, खटाव येथे 21 ते 25 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दहिवडी येथे 23 ते 26 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाई येथे 25 ते 30 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोरेगाव येथे 21 ते 28 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाटण येथे 24 ते 27 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा येथे 24 सप्टेंबर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाबळेश्वर येथे 26 ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रशिक्षण उमेदवार निवड मेळावा मेळावा घेण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आपल्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी त्यांच्या आस्थापनेवर किमान 10 कर्मचारी असणे आवश्यक आहे. टॅन,पॅन, उद्योग आधार, ईएसआयसी,जीएसटी इ. कागदपत्रे घेवून स्वःत मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे. तरी जिल्हयातील सातारा सर्व आस्थापनानी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जागा अधिसूचित कराव्यात. सदर संकेतस्थळ बंद असेल तरीही आस्थापनेनी ऑफलाईन पध्दतीने या कार्यालयास जागा कळवाव्यात किंवा मेळाव्याच्या ठिकाणी कागदपत्रे घेवून प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात.बेरोजगार उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. निवड झालेल्या इ.12 वी पास उमेदवारांना रु. 6 हजार, डिप्लोमा/आयटीआय उमेदवारांना रु.8000 व पदवी/पदव्युत्तर उमेदवारांना रु.10 हजार इतके विद्यावेतन सहा महिन्यांपर्यंत अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02162-239938 व ई.मेल [email protected] वर संपर्क साधावा अशी माहिती श्री. पवार यांनी दिली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!