
मुधोजी कॉलेजच्या विजेत्या महिला व्हॉलीबॉल संघाबरोबर बक्षीस वितरण प्रसंगी विविध मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ ) :-
शहाजीराजे महाविद्यालय,खटाव येथे संपन्न झालेल्या सातारा विभागीय व्हॉलीबॉल महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयास विजेतेपद मिळाले.बादफेरीच्या स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने महिला महाविद्यलय कराड, शहाजीराजे महाविद्यालय खटाव या संघावरती सरळ सेटमध्ये विजय मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आणि विजेती पदाचे हॅट्रिक साजरी केली यास संघामध्ये श्रद्धा शिंदे, प्रणाली गायकवाड,वैष्णवी फडतरे, साक्षी गायकवाड,श्रद्धा निंबाळकर, शिवानी शिंदे,प्रतीक्षा शिंदे,संजीवनी जाधव या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे,प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.