फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ०२ ):-
फलटण नगरपरिषद, फलटण येथीलप्रभाग क्र. ६ मध्ये ब्राह्मणगल्ली येथिल डि पी शिफ्ट करणे रक्कम रु.१८ लाख ०७ हजार ६१०/- मंजूर करण्यात आली असून सदर विकास कामांचा शुभारंभ गुरुवार, दि.०३ ऑक्टोबर २०२४ रोजी, सकाळी ०९:०० वा. कसबा पेठ येथीलश्री. गणपती मंदीर, ब्राह्मण गल्ली, फलटण. येथे संपन्न होणार आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री. दिपकराव चव्हाण हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून या विविध विकासकामांचे उद्घाटण कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण चे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) आणि, जिल्हा परिषद, सातारा चे मा. अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे .यावेळी प्रभाग क्र. ६ मधिल सर्व नागरीक बंधु भगिनींना या कार्यकमास उपस्थित राहाण्याचे अवाहन प्रभाग क्र . ६ मधील फ न प फलटण च्या मा. नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे , फ न प फलटण चे मा. नगरसेवक श्री. किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैय्या ) यांनी केले आहे