फलटण तालुका तलाठी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी लक्ष्मण सुभाष अहिवळे तर सरचिटणीस पदी योगेश अशोक धेंडे यांची बिनविरोध निवड

लक्ष्मण सुभाष अहिवळे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ५ ) :-

फलटण तालुका तलाठी संघटनेची सन २०२४-२०२९ पर्यंत कार्यकारणी निवड बैठक आज पार पडली यावेळी श्री. लक्ष्मण सुभाष अहिवळे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली तसेच श्री.योगेश अशोक धेंडे यांची देखील सलग दुसऱ्यांदा सरचिटणीस पदी निवड झाली.

फलटण तालुका तलाठी संघटनेची नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे

१.लक्ष्मण सुभाष अहिवळे :-अध्यक्ष

२.श्री गणेश दत्तात्रय मोरे :- उपाध्यक्ष

३.रावसाहेब काळे :- कार्याध्यक्ष

४.महावीर अहिवळे :- कोषाध्यक्ष

५.योगेश अशोक धेंडे-सरचिटणीस

६.निलेश गवंड :- खजिनदार

७.मनिषा सावळकर :- हिशोब तपासनीस

८.शिलवंत चव्हाण :- संघटक

९.संदीप कुंभार :- सल्लागार

१०.दिपाली शिंदे : – महिला प्रतिनिधी

११.दिपक नलगे :- सहसरचिटणीस

नुतन कार्यकारिणी निवड सभे प्रसंगी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे माजी उपाध्यक्ष मा.श्री.विठ्ठलराव सोडमिसे, सातारा जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत पारवे यांचे अध्यक्षतेखाली ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी सातारा जिल्हा तलाठी संघाचे माजी सरचिटणीस भालचंद्र भादुले तसेच फलटण तालुका तलाठी संघाचे माजी सरचिटणीस बाळासाहेब चोरमले,चंद्रकांत सरगर,सचिन क्षीरसागर, हनुमंत नागरवाड तसेच फलटण तालुका तलासे संघाचे सर्व आजी-माजी सभासद याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!