फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. ८ ): –
महाराष्ट्र खो – खो असोसिएशन आणि श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा ६० वा वाढदिवस उद्या बुधवार दि. ९ ऑक्टोंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी देवदर्शन आणि कुटुंबाच्यावतीने औक्षण व शुभेच्छा कार्यक्रमानंतर सरोज व्हीला, लक्ष्मीनगर, फलटणच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत.