शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, पालक व अधिकारी वर्ग
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रा. लि. या कंपनीमध्ये मंगळवार दि.०८ आक्टोंबर रोजी रोजी उच्च शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील व प्राविण्यप्राप्त मुलींना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून कंपनीमार्फत शालेय फी अथवा रुपये ५०,०००/- पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात आली. कंपनीचे कार्यक्षेत्र असणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व पंजाब या राज्यातील ५० मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. सदरची शिष्यवृत्ती मुलींना पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक वर्षी देण्यात येणार आहे.याप्रसंगी श्री विन्नी पोडुवाल प्रेसिडेंट, एशिया, श्री अंवेलिनो ओलिव्हेरा – व्हाईस प्रेसिडेंट, इंडिया. – सौ. मंजुश्री चव्हाण – बिजनेस सपोर्ट मॅनेजर, तसेच कंपनी व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी हनुमंत जगताप, मनप्रीत सिंग, पालिवेला राजा, सुहास देशपांडे, श्री लिऑन वर्डिस, अनिल कवठेकर, प्रविण आवटी, मनोज भुतकर, सौ. अर्पिता श्रीवास्तव, विद्याधर परब, रावसाहेब मोकाशी, श्री जय शर्मा, मुकेश चव्हाण आदी अधिकारी व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते.सौ. मंजुश्री चव्हाण यांनी प्रास्ताविकात महिलांच्या उन्नतीसाठी कंपनीने हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती सांगून आर्थिक परिस्थितीमुळे मुलींना उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन कंपनीने सदरची योजना आणल्याचे सांगितले.श्रायबर डायनामिक्स कपनी नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असते, मुलींना समाजात आदराचे स्थान मिळावे, त्यांनी चांगले उच्च शिक्षण घेऊन आपली व कुटुंबाची प्रगती करावी, यासाठी कंपनीने शिष्यवृत्ती योजना आणली असून सामाजिक कार्यासाठी कंपनी नेहमीच कटिबध्द् आहे असे प्रतिपादन विन्नी पोडुवाल व अॅवेलिनो ओलिव्हेरा यानी केले.सदर शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थिनींना शिक्षणात मोलाची मदत होणार असल्याच्या भावना उपस्थित विद्यार्थिनी व पालकांनी व्यक्त केल्या. हनुमंत जगताप यांनी आभार प्रदर्शन केले .