फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कॉलेज ऑफ फार्मसी ॲण्ड रिसर्च सेंटर सुरु : प्रवेश घेण्याचे आवाहन

फार्मसी महाविद्यालय प्रशस्त इमारत

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. १०) : –

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कॉलेज ऑफ फार्मसी ॲण्ड रिसर्च सेंटर, फलटण च्या माध्यमातून सोसायटीचे आणखी एक महाविद्यालय फलटण येथे सुरु करण्यात आले असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. सदर महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ पासून सुरु करण्यात आले आहे. सदर कोर्सचा DTE Code – 16340 असूनबी. फार्मसी ६० जागा, आणि डी. फार्मसी ६० जागा असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होऊ शकतील अशी व्यवस्था केल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. या महाविद्यालयास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली (PCI), तंत्रशिक्षण संचलनालय, मुंबई (DTE), महाराष्ट्र शासन (Govt. of Maharashtra), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) यांची मान्यता प्राप्त झाल्याचे प्राचार्य निकम यांनी निदर्शनास आणून दिले आहे. निसर्गरम्य परिसरातील महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, अत्याधुनिक प्रयोग शाळा, सुसज्ज ग्रंथालय, अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षकवृंद, स्मार्ट क्लास रुम, हर्बल गार्डन, विद्यार्थी/ विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची सुविधा, पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा सुविधा उपलब्ध आहेत. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद सखाराम निकम, फलटण यांच्याशी मोबाईल नंबर ९४२२०३८३७५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फोटो : फार्मसी महाविद्यालय प्रशस्त इमारत

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!