वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या वतीने स्पर्धा संपन्न

जलतरण स्पर्धांचा शुभारंभ करताना महेश रोकडे व वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे पदाधिकारी (छाया: सागर लाड फोटो)

फलटण टुडे वृत्तसेवा( बारामती ) :-

वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या वतीने तालुका स्तरावरील जलतरण स्पर्धा संपन्न झाली. या मध्ये वय वर्ष १२ पासून ६५ वर्षा वरील स्पर्धेकानी भाग घेतला .या प्रसंगी बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे अध्यक्ष डॉ.अशोक तांबे, उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर, सचिव विश्वास शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे, संचालक अमोल गावडे ,बाळासाहेब टाटिया ,अनिल सातव, दीपक बनकर, पंढरीनाथ नाळे , डॉ गीता व्होरा,शर्मिष्ठा जाधव व सल्लागार सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, राजेंद्र जाधव, महेंद्र ओसवाल आणि आयर्नमॅन डॉ पांडुरंग गावडे,ओम सावळेपाटील,महेश साळुंके व जमीर शेख ,डॉ अमित कोकरे,डॉ विश्वनाथ नरुटे, डॉ, सचिन कोकणे, डॉ राहुल तुपे, डॉ धनंजय खताळ ,डॉ चंद्रकांत हाके,डॉ सचिन बालगुडे , ज्योतीराम माळी ,अशोक देवकर ,संतोष कुलकर्णी ,महेश भालेराव ,युवराज नलावडे, इरफान तांबोळी, विवेक जाधव, संजोग सनस गणेश सातव ,सो रेखा धनगर ,अनघा कुलकर्णी व पत्रकार तैनूर शेख आदी मान्यवर उपस्तीत होते.ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करता यावी व त्यांचा आत्मविश्वास,खिलाडू वृत्ती वाढावी या उदेश्याने सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे यांनी सांगितले.विविध स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात जावा म्हणून सराव साठी स्वीमर्स क्लब सुविधा उपलब्ध करून देत आहेत तर स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना शाबासकी देत असल्याचे सचिव विश्वास शेळके यांनी सांगितले.विविध वयोगटातील खेळाडूंनी ५० व १०० मीटर फ्री स्टाईल,ब्रेस स्ट्रोक आदी मध्ये सहभाग घेऊन विजेतेपद मिळवले तर सहभागी ना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध वयोगटात ३०० स्पर्धकांनी भाग घेतला. *ज्येष्ठाचा सहभाग उल्लेखनीय* 60 वर्ष वयोगटातील अनेक ज्येष्ठ खेळाडू यांनी मधुमेह,रक्तदाब,गुडघेदुखी आदी विविध आजारावर सरावाच्या माध्यमातून मात करून स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन पूर्ण करून विजेतेपद मिळवले व तरुणांना सुद्धा लाजवेल अशी कामगिरी केल्याने उपस्थित पालक,खेळाडू,प्रशिक्षक व प्रेक्षक यांनी टाळ्या वाजवून अभिवादन केलेसूत्रसंचालक अनिल सावळेपाटील यांनी केले आभार व्यवस्थापक सुनील खाडे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!