फलटण टुडे (सातारा दि. 5 ):-
सातारा जिल्ह्यातील विधानसभा निडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी तसेच त्यांच्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदार संघाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध/प्रसारित होणाऱ्या वृत्तपत्रात उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती प्रसिद्ध देणे अनिवार्य आहे.
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभमीबाबची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून जिल्हा निहाय वृत्तपत्रांची यादी कळविण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दैनिक पुढारी, , दैनिक सकाळ व दैनिक सांजवात या दैनिकांचा समावेश आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.