
फलटण टुडे वृत्तसेवा :-
बुधवार दि ०६ नोव्हेंबर झालेल्या मंगळवार पेठेतील मतदार भेटी दरम्यान बौद्ध मतदारांचा दीपक चव्हाण यांना पाठिंबा असल्याची तेथील युवकवर्ग व नागरिकांनी यावेळी श्रीमंत अनिकेतराजे यांना सांगितले.
यावेळी बोलताना राजे गट बौद्ध समाजाला मानाचे पद देणार असल्याने आम्ही तुतारीचा प्रचार करणार असल्याचे माजी नगरसेवक सनी अहिवळे सांगितले
सदर बैठक ही माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली, यावेळी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व माजी नगरसेवक सनी अहिवळे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.