आचार्य अकॅडमी चे यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग
फलटण टुडे (बारामती )::-
आता माझ्यासमोर ५९० असे विद्यार्थी आहेत, ज्यांच्यात स्वत:ची कंपनी सुरू करून दीड-दोनशे लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. अशा क्षमतेच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याला बळ देण्यासाठी १७२९ आचार्य अॅकॅडमीने सातत्याने प्रयत्न केले आहेत,” असे प्रतिपादन संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे यांनी केले.
ते १७२९ आचार्य अॅकॅडमीद्वारे आयोजित प्रज्ञाशोध कार्यशाळेच्या समारोप समारंभात बोलत होते.
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज
“उशिरा माहिती मिळाल्याने रस्ते चुकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेची ओळख दहावीतच व्हावी आणि दहावीनंतर योग्य करिअर निवडता यावी, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली,” असे श्री. मुटकूळे यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेदरम्यान दहावीतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व इंग्रजी हे विषय सोप्या पद्धतीने शिकवण्यात आले.
शिष्यवृत्तीचे जाहीर आवाहन
आठवीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी झालेल्या १०० विद्यार्थ्यांना १७२९ आचार्य अॅकॅडमीकडून १००% टक्के स्कॉलरशिप दिली जाणार असल्याचेही ज्ञानेशवर मुटकूळे यांनी जाहीर केले. तसेच, ए एस ए टी स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी पहिल्या पाच विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत शुल्क सवलत* मिळेल, तर नंतरच्या २० विद्यार्थ्यांना ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जाईल असेही सांगितले
३० तालुक्यांतील ५९० विद्यार्थ्यांचा सहभाग
सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील ३० तालुक्यांतील ५९० विद्यार्थ्यांनी या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेत सहभाग घेतला. गणित, विज्ञान व इंग्रजी हे विषय अधिक समजण्यास सोपे व्हावेत, यासाठी १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचे मोजमाप करणारी ए एस ए टी स्कॉलरशिप परीक्षाही या कार्यशाळेचा एक भाग होती.
विद्यार्थ्यांची कौतुकास्पद प्रतिक्रिया
“ही कार्यशाळा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरली आहे,” अशी प्रतिक्रिया बार्शी येथील वेदांतीका रोहित जगदाळे या विद्यार्थ्यानी दिली. “शिस्तबद्ध वातावरण, शिक्षकांची मेहनत, आणि सर्व स्टाफकडून मिळालेली आपुलकीची वागणूक यामुळे आम्हाला इथे घराची उणीव भासली नाही,” असे सातारा येथील मनोज शिंदे या विद्यार्थिनीने सांगितले.
खास मार्गदर्शन सत्र
कार्यशाळेदरम्यान प्रा .सुमीत सिनगारे यांनी ‘स्वयंम’ उपग्रह प्रकल्पातील अनुभव* आणि प्रा प्रतीक पाटील यांनी इस्रोच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी एस ओ बापू काटकर यांनी केले. या वेळी संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे, संचालक सुमीत सिनगारे, संचालक प्रवीण ढवळे, संचालक कमलाकर टेकवडे, सी ओ ओ निलेश बनकर, वाकड शाखेचे प्रमुख वेदज्ञ आणि रहाटणी शाखेचे प्रमुख प्रतीक पाटील, उपस्थित होते. विद्यार्थ्या, व पालक उपस्तीत होते.