सृजन बिचुकले
फलटण टुडे न्यूज़ नेटवर्क (फलटण दि. 02):-
फलटण येथील नामांकित क्रिकेट अकादमी श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब चा खेळाडू सृजन बिचुकले याची सुरत (गुजरात ) येथे होणाऱ्या 16 वर्षाखालील नामांकीत व भारतातील प्रतिष्ठित विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे
महाराष्ट्र राज्य आमंत्रित क्रिकेट स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याचे कर्णधार पद भूषवत सृजन बिचुकले याने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फलंदाजी मध्ये सर्वाधिक रन्स बनवल्या यामध्ये १ शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता आणि गोलंदाजी मध्ये 19 विकेटस् मिळवत सृजन ने कर्णधार पदाला साजेशी कमिगिरी केली व या उत्कृष्ठ कामगिरी च्या जोरावर त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली .
त्याला क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक श्री . मिलिंद सहस्त्रबुद्धे सर श्री . सोमनाथ चौधरी सर श्री . मिलिंद ( टिल्लू )चौधरी सर श्री . संदेश साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री . सदानंद प्रधान सर यांचे आशिर्वाद व सहकार्य लाभले .
या निवडीबद्दल सृजन चे व त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक यांचे विधान परिषदेचे माजी अध्यक्ष मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
चौकट :-
श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब चे सलग 2 वर्षे 2 खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत . मागच्या वर्षी याच स्पर्धेत यशराज मदने याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते .
- सोमनाथ चौधरी
क्रिकेट क्रीडा प्रशिक्षक,
श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब,फलटण