जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी व उपस्तीत मान्यवर (छायाचित्र: प्रशांत कुचेकर)
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-
जागृती अपंग विश्वस्त संस्था,बारामती यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मंगळवार दि.०३ नोव्हेंबर रोजी बारामती शहर व तालुक्यातील अपंग ज्येष्ठ,तरुण,महिला व विद्यार्थी यांना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन व दिव्यांग अपंग यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आणि गरजू अपंग यांना ब्लॅंकेट वाटप व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी आपण सेलच्या राज्य अध्यक्षा संगीता ढवाण, बारामती पंचायत समिती दिव्या ंग विभागाचे समन्वयक संदीप शिंदे,महसूल विभागचे सर्कल अधिकारी सुधीर बडदे, तलाठी अमोल मारग आणि जागृती अपंग विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड, उपाध्यक्ष अजिज शेख, कार्याध्यक्ष विनोद खरात ,सचिव संजय जाधव, प्रदीप शेंडे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
दिव्यांग अपंग यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा व उदरनिर्वाह करता यावा यासाठी जागृती अपंग विश्वस्त संस्था बारामती तालुक्यामध्ये कार्य करत असून पुढील वर्षीपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अपंगांना बारामती भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सांगितले.
संस्थेचे कार्य उत्तम असून त्यांच्या मागण्या शासन दरबारी अजित पवार यांच्या माध्यमातून पोहचवू अशी ग्वाही बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी दिली.
याप्रसंगी पंचायत समितीच्या वतीने संदीप शिंदे यांनी विविध योजनांची व आवश्यक कागतपत्रे यांची माहिती दिली. याप्रसंगी बारामती शहर आणि तालुक्यातील जवळपास ५०० अपंग उपस्तीत होते. या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
आभार अजीज शेख यांनी मानले.