फलटण टुडे (सातारा दि. 3 ): –
शालांतपूर्व इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येते. या योजनेचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विदयार्थ्यांना रुपये १०० ते २०० पर्यंत दरमहा शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यात येते. नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंदांच्या विशेष शाळांमधील १८ वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांना दरमहा रुपये १५० एवढी शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच दिव्यांगांच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रुपये ३०० प्रदान करण्यात येते.
मागील वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत (गुणपत्रिकेची सत्यप्रत). वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्राची सत्यप्रत, संबंधित शिक्षण संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडावे, आधारकार्डची छायांकीत प्रत, आधारकार्ड संलग्नीत बँक खाते क्रमांक, बँकेच्या पासबुकची छायांकीत प्रत, बँकेचा आय.एफ.एस.सी कोड नंबर अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयात येथे संपर्क करावा.